आता आयकर अधिनियम 1961 च्या 139 कलम नुसार आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्डसोबतच आधार कार्ड नंबर देणे ही अनिवार्य केले आहे. 1 जुलैच्या आत तुम्हाला पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्यावर कारवाई होई शकते.
पॅनकार्डला आधारकार्ड लिंक कसं करायचं?
- सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. जर तुमचे अकाउंट तयार नसेल तर तुम्हाला रजिस्टर करून तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- लॉग इन केल्यावर पेजच्या वरच्या बाजुला तुम्हाला ‘सर्विस रिक्वेस्ट’ असा निळ्या गुलाबी रंगामध्ये दिसणा-या स्ट्रिपमध्ये तुम्हाला प्रोफाईल सेटिंग निवडावी लागेल.
- प्रोफाईल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून सिलेक्ट करा.
- लिंकच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरण्याची गरज आहे. कॅप्चा कोड भरला की पुढची प्रोसेस सुरू होईल.
- संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला खाली ‘लिंक आधार’ हा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. यावर क्लिक करताच तुमची पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा